राखी पौर्णिमेचा सण आपल्या भावना मूर्त रूपात व्यक्त करण्याचा सण! या दिवशी कोणत्याही भावाला राखीपेक्षा मोठी भेटवस्तू कोणती असू शकते? त्यातही ती राखी स्वत: तयार केलेली असेल तर तिचा एक वेगळाच आनंद असतो.
राखी सुशोभित करण्यासाठी रेशमी धाग्याचा वापर केला जातो. हा धागा साधारण किंवा त्याला डिझाइनर बीड्स किंवा कोणत्याही प्रकारच्या धार्मिक प्रतिकाने सुशोभित केलेला असू शकतो. या राखीमध्ये हिरे लावू शकतो. राखी तयार करण्यासाठी आम्ही आपल्याला काही टिप्स देत आहोत. त्यामध्ये आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून आपल्या आवडीची राखी तयार करू शकाल. यासाठी आपल्याला खालील बाबींची आवश्यकता भासेल:-
रेशमाचा बहुरंगी धागा, सूती धागा, लाकडाचे बीड्स किंवा मोती, सिक्वीन, कात्री, गोंद आणि रेशमी धाग्याचा एक गुच्छ, आपणास रंगीबिरंगी राखी हवी असल्यास बहुरंगी गुच्छ घ्या. लाल आणि पिवळा रंग शुभ मानला जातो. याशिवाय आपण सोनेरी धाग्याचाही वापर करू शकता.
धागा 30 इंच इतका लांब हवा. गुच्छाची अर्धी लांबी वळवा. सूती धाग्याचा प्रयोग करताना एक चतुर्थांश लांबीवर एक गाठ बांधा. त्यानंतर एकत्र झालेल्या मोडाला कापून टाकून शेंड्याचा भाग ब्रशच्या मदतीने छाटा किंवा साफ करा. धाग्याचा लांब असलेला हिस्सा दोन भागात विभागून घ्या आणि विरूद्ध दिशेकडे फिरवून सोडून द्या. यांच्या शेंड्यावर गाठ बांधा आणि उरलेला भाग पसरवून द्या. आता मध्यभागी छाटलेला हिस्सा दाबून याला मोटिफ, बीड्स, सीक्विनने सजवा.
आपला भाऊ अधिक काळ हातात राखी बांधून ठेवत असल्यास आपण रेशमाच्या जागी कालवा किंवा मौलीच्या धाग्याचा वापर करणे आवश्यक आहे. काही कुटुंबात राखी तीन दिवसानंतर सोडली जाते तर काही कुटुंबात दसर्याच्या दिवशी सोडतात. अशावेळी मौलीने तयार केलेली राखी दीर्घकाळ टिकू शकते.
हे तयार करण्यासाठी एक मौली किंवा कालवा घ्या. सूती धागा आणि कोणत्याही देवाचे लहानसे प्रतीक चिन्ह किंवा रूद्राक्ष घ्या. तुळशीचे दाणे, चंदनाचे दाणे किंवा छोट्याशा शंखाचा उपयोग केला जाऊ शकतो.
50 इंच इतका लांब धागा घेऊन बरोबर मधोमध वळवा. शेंड्याचा काही भाग सोडून गाठ बांधा. मध्यभागी प्रतीक चिन्ह किंवा रूद्राक्ष गोंदाने चिकटवा. आता राखीच्या दोन्ही धाग्यांवर तुळशीचे, चंदनाचे दाणे किंवा लहानसे शंख चिकटवा.
चांदी किंवा सोन्याची राखी
आपण चांदी किंवा सोन्याची राखी विकत घेतल्यास तिच्यात आपल्या कलाकारी दाखवू शकता. या राखीला बांधण्यासाठी अनेक प्रकारच्या धाग्यांचा उपयोग केला जातो.
जुन्या लॉकेटची राखी
सोनेरी किंवा सुंदर धागे, सोनेरी किंवा सुंदर दाणे आणि जुने लॉकेट घ्या. धाग्यावरील समान अंतरावर गाठ बांधा. मधोमध दाणे लावून मधोमध लॉकेट लावून नंतर दोन्ही शेंड्याना बांधा.