Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Rakhi Color राशीनुसार भावाला कोणत्या रंगाची राखी बांधावी आणि कोणती मिठाई खायला द्यावी...

rakhi
, मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (12:03 IST)
रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या भावाला त्याच्या राशीनुसार राखी बांधा आणि मिठाई खाऊ घाला. आपसात प्रेम राहील आणि भावा-बहिणीला यश मिळेल
 
मेष राशीच्या भावाला मालपुआ खाऊ घाला आणि लाल दोर्‍याची राखी बांधा.
 
वृषभ राशीच्या भावाला दुधापासून बनवलेली मिठाई खाऊ घाला आणि पांढर्‍या रेशमी दोर्‍याची राखी बांधा.
 
मिथुन राशीच्या भावाला बेसनाची मिठाई खाऊ घाला आणि हिरव्या रंगाची राखी बांधा.
 
कर्क राशीच्या भावाला रबडी खाऊ घाला आणि पिवळ्या रेशमी दोर्‍याची राखी बांधा.
 
सिंह राशीच्या भावाला रस असलेली मिठाई खाऊ घाला आणि पंचरंगी धाग्याची राखी बांधा.
 
कन्या राशीच्या भावाला मोतीचूर लाडू खाऊ घाला आणि गणेश चिन्ह असलेली राखी बांधा.
 
तूळ राशीच्या भावाला खीर किंवा घरगुती मिठाई खाऊ घाला आणि रेशमी हलक्या पिवळ्या दोर्‍याची राखी बांधा.
 
वृश्चिक राशीच्या भावाला गुळापासून बनवलेली मिठाई खाऊ घाला आणि गुलाबी दोर्‍याची राखी बांधा.
 
धनु राशीच्या भावाला रसगुल्ला खाऊ घाला आणि पिवळ्या व पांढऱ्या दोर्‍याने बनवलेली राखी बांधा.
 
मकर राशीच्या भावाला पाकातील मिठाई खाऊ घाला आणि मिश्र रंगाच्या धाग्याने राखी बांधा.
 
कुंभ राशीच्या भावाला हिरवी मिठाई खाऊ घाला आणि निळ्या रंगाची राखी बांधा.
 
मीन राशीच्या भावाला मिल्क केक खायला द्या आणि पिवळ्या-निळ्या जरीची राखी बांधा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Raksha Bandhan 2022 भावाला राखी बांधताना ताटात असाव्या या 8 वस्तू