रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला भावाने जर बहिणीला तिच्या राशीनुसार भेटवस्तू दिली तर ती शुभ फळ देणारी ठरेल.
मेष
मेष राशीच्या बहिणीला झिंक मेटल ने तयार केलेले शोपीस देऊ शकता. किंवा लाल रंगाची वस्तू देणे ही शुभ ठरेल.
वृषभ
वृषभ राशीच्या बहिणीला रेशीम परिधान, परफ्यूम, किंवा मार्बलचे शोपीस देऊ शकता.
मिथुन
या राशीच्या बहिणीला ब्रँडेड पेन, निसर्गरम्य सौंदर्य दर्शवत असलेली पेंटिंग देऊ शकता. बहीण लहान असल्यास खेळणी घेऊ शकता.
कर्क
या राशीच्या बहिणीसाठी चांदी किंवा मोत्याचे दागिने घेणे शुभ ठरेल. एकूण गिफ्ट पांढरा रंगाचं असेल तर उत्तम राहील.
सिंह
सिंह राशीच्या बहिणीला सोन्याचे दागिने, ताब्यांची वस्तू देऊ शकता. लाकडाचे फर्निचर देणे ही योग्य राहील.
कन्या
कन्या राशीच्या बहिणीला कांस्य धातूने तयार केलेले शोपीस, गणपतीची मूर्ती, हिरवा ड्रेस इत्यादी भेट करू शकता.
तुला
या राशीच्या बहिणीसाठी कपडे, दागिने, गाडी, परफ्यूम व इतर गिफ्ट उपयुक्त राहतील.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या बहिणीला तांब्याची वस्तू, कोरल रत्न जडलेली अंगठी देऊ शकता.
धनू
या राशीच्या बहिणीला कपडे, सोन्याचे दागिने किंवा पुस्तक देऊ शकता.
मकर
मकर राशीच्या बहिणीसाठी आपण मोबाइल, लॅपटॉप किंवा गाडी घेऊ शकता.
कुंभ
कुंभ रास असलेल्या बहिणीला हातातील कडे, दगडाच्या वस्तू किंवा नीलम रत्नाची अंगठी भेट देऊ शकता.
मीन
जर बहिणीची रास मीन असेल तर तिला सोन्याचे दागिने किंवा पिवळ्या रंगाचे कपडे देऊ शकता.