Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारताच्या इतर प्रांतात रक्षा बंधन कसा साजरा केला जातो ?

भारताच्या इतर प्रांतात रक्षा बंधन कसा साजरा केला जातो ?
, मंगळवार, 28 जुलै 2020 (16:08 IST)
ज्या प्रमाणे भारताच्या इतर प्रांतामध्ये मकर संक्रांती आणि दिवाळी वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरी  केली जाते त्याचप्रमाणे राखीचा सण देखील वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. भारतात हे सण निव्वळ भाऊ बहिणींपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही अनेक कारणास्तव हा सण साजरा केला जातो. चला जाणून घेऊ या ही खास माहिती.
 
1 भारताच्या पश्चिमी घाट आणि इतर समुद्री भागात या दिवशी मेघदेव इंद्र आणि समुद्राचे देव वरुण यांची पूजा केली जाते. मासेमार देखील मासोळ्या पकडण्याची सुरुवात याच दिवस पासून करतात. या दिवशी समुद्रदेव वरुण यांना श्रावणी पौर्णिमेला नारळ दिले जाते. म्हणजे समुद्रात वाहिले जातात जेणे करून समुद्र देव सर्व प्रकाराने आपले रक्षण करतील. म्हणून राखी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा देखील म्हणतात. 
 
2 अश्याच प्रकारे दक्षिण भारतात देखील रक्षा बंधनाला अबित्तम म्हटलं जातं कारण या दिवशी पवित्र दोरा जानवं बदललं जातं. याला श्रावणी किंवा ऋषी तरपण देखील म्हणतात. ग्रंथांमध्ये रक्षाबंधनाला पुण्य देणारा, पापाचा नाशक, विषाचे तारक मानले जाते जे वाईट कर्माचा नाश करतात. 
 
3 उत्तर भारतात या सणाला कजरी पौर्णिमेच्या नावाने ओळखतात. या दरम्यान शेतात गहू आणि इतर धान्य पेरले जातात आणि चांगल्या पिकेच्या आशेने देवी दुर्गा ची पूजा केली जाते. 
 
4 त्याच प्रमाणे गुजरात मध्ये कापसाला पंचगव्य (दूध,दही,तूप,गोमूत्र,गायीचे शेण) मध्ये भिजवून त्याला शिवलिंगाच्या सभोवती बांधून देतात. या पूजेला पवित्रोपन्ना देखील म्हणतात. इथे देखील बहिणीचं भावाला राखी बांधतात. 
 
5 बहुतेक भागात या सणाला भाऊ बहिणींच्या रूपात साजरा करतात. तसेच अंचल भागात या सणाला पिकाशी जोडलं जातं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माहेरवाशीण