Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Raksha Bandhan 2022: रक्षा बंधन सणाला चुकुन करु नये हे 20 कामे

rakhi
, बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (10:08 IST)
जाणून घ्या रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या अशा 20 गोष्टी आहेत ज्या चुकुन करु नये-
 
1. या दिवशी कोणत्याही कारणामुळे क्रोध करणे किंवा वाद टाळा.
 
2. या दिवशी चुकुन अहंकाराचे प्रदर्शन करु नये.
 
3. या दिवशी बहिण किंवा भावाचं अपमान करु नये. या दिवशी सर्व वाद विसरुन स्वत:हून भावंडांना निमंत्रण करावं.
 
4. या दिवशी आपल्याकडून कोणतेही असे कार्य घडू नये ज्यामुळे लोकांना वेदना पोहचतील किंवा ते नियमाविरुद्ध असेल.
 
5. या दिवशी निराश, उदास, किंवा रागात राहू नये. हा सण उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला पाहिजे.
 
6. या दिवशी कोणतेही घाणेरडे काम करु नये. तन, मन आणि घर देखील स्वच्छ असावं.
 
7. या दिवशी दिशेकडे विशेष लक्ष द्यावं. चुकुनही आपल्या भावाला दक्षिण दिशेकडे मुख करुन बसवू नये.
 
8. या दिवशी शुभ मुहूर्तावर राखी बांधावी. चुकुनही राहुकाल किंवा भद्राकाल या वेळेत राखी बांधू नये.
 
9. काळी, तुटलेली, खंडित राखी बांधू नये. अशी राखी अशुभ फळ देते असे मानले गेले आहे.
 
10. प्लास्टिक‍ निर्मित राखी बांधणे टाळा कारण अशी राखी अशुद्ध वस्तूंने निर्मित असते, याने दुर्भाग्य येऊन कामात अडथळे येऊ शकतात.
 
11. अशुभ चिन्हांची राखी, देवांचे फोटो असलेली राखी देखील चुकुन बांधू नये.
 
12. बहिणीला भेट म्हणून काळ्या रंगाचे वस्त्र, धारदार वस्तू, काचेच्या वस्तू, फोटोफ्रेम, मिक्सर, रुमाल, टॉवेल, जोडे-चपला आणि घड्याळ अशा वस्तू भेट करु नये.
 
13. चुकुनही या दिवशी नशा करु नये कारण या दिवशी पौर्णिमा असते.
 
14. राखी बांधताना डोकं झाकायला विसरु नये. बहिण आणि भावाचं डोकं झाकलेलं असावं.
 
15. राखीचा दोरा काळ्या रंगाचा नसावा. पिवळा, पांढरा किंवा लाल असावा.
 
16. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना राखी मंत्र उच्चारण करायला विसरु नये.
 
17. भावाने आरतीच्या थाळीत दक्षिणा दिल्याशिवाय जागेवरुन उठू नये.
 
18. राखीच्या थाळीत तिखट किंवा नमकीन पदार्थ ठेवू नये. 
 
19. राखी बांधल्यावर भावाने आपल्या बहिणीच्या पाया पडायला हवं. रक्षाबंधनच्या दिवशी सर्वप्रथम गणपतीला राखी बांधली जाते आणि नंतर शिव, हनुमान, श्रीकृष्‍ण, नागदेव यांना राखी बांधतात.
 
20. चुकुनही डाव्या मनगटावर राखी बांधू नये. उजव्या मनगटावर राखी बांधली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati