रामनवमी हा चैत्र महिन्यातील शुद्ध नवमीला आपल्या लाडक्या श्रीराम प्रभूंच्या अवतारण्याचा दिवस होय. श्रीराम हिंदू धर्मीयांचे लाडके दैवत असे. जग कल्याणासाठी धर्माचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवान विष्णूंच्या दशावतारामधून श्रीराम हे सातवे अवतार असे.
त्रेतायुगात अयोध्येचे राजा दशरथ यांना 3 राण्या होत्या. कौशल्या, कैकेयी, सुमित्रा. यांना एकच दुःख होते त्यांना एकही अपत्य नव्हती. आपल्याला पुत्र संतान प्राप्त होण्यासाठी राजा दशरथाने आपल्या कुलगुरूंच्या सांगण्याने पुत्रकामेष्टी याग(यज्ञ) केले. त्या पवित्र अग्नीतून अग्निदेव प्रकट होऊन त्यांनी राजाला प्रसन्न होऊन प्रसाद फळे दिली. ते प्रसाद भक्षण केल्यावर तिन्ही राण्यांना पुत्र रत्नाची प्राप्ती झाली.
कौशल्येस राम, कैकेयीस भरत आणि सुमित्रेस शत्रुघ्न आणि लक्ष्मण होय. श्रीरामांनी बाल्यावस्थातच आपल्या गुरूच्या यज्ञाचे, धर्माचे रक्षण केले, दैत्यांचा संहार केला. अहिल्येचा उद्धार केला. राजा जनकाच्या मिथिला नगरीत जाऊन शिव धनुष्य भंग करून सीतेशी विवाह केले. मातृ-पितृच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी 14 वर्षाचा वनवास पत्करला. सीतेचे हरण करणाऱ्या लंकाधिपती रावण आणि त्यांच्या राक्षस सेनेचा संहार केला आणि रावणाला मुक्ती प्रदान केली.
श्रीराम हे पितृवचन पालक, मातृभक्त, आदर्श पुत्र, पती, बंधू, स्वामी, धर्मरक्षक, कर्तव्यदक्ष, प्रजापालक, मर्यादा पुरुषोत्तम आहे. त्यांच्यामधील कर्तव्य निष्ठा, संयम शौर्य, औदार्य गुण आचरणीय आहे.
ह्या आदर्श देवतांची आठवण राहण्यासाठी रामाच्या जन्मदिवसाच्या म्हणजेच रामनवमीच्या दिनी मंदिरात, मठात, भजन,पूजन, कीर्तन, प्रवचन केले जाते. अश्या प्रकारे जन्मोत्सव साजरा केला जातो.
काही काही ठिकाणी गुढीपाढवा ते रामनवमी च्या काळात रामायण ग्रंथाचे वाचन, गीत रामायणाचे गायनाचे कार्यक्रम केले जाते. दुपारी 12 वाजता रामजन्माचा पाळणा म्हणून राम जन्मोत्सव साजरा केला जातो. मंदिरात सुंठवडा वाटप केला जातो. हा दिवस अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. चला मग श्रीरामाचा जयघोष करू या..
|| सीयापती रामचंद्रांची जय || जय श्रीराम ||