राम नावातच अपरिमित शक्ती आहे. त्यांचे नावाचे दगड पाण्यात बुडाले नाही. त्यांनी सोडलेले अमोघ बाण रामबाण अचूक मानले गेले तर त्यांच्या मंत्राच्या शक्ती बद्दल काय म्हणता येईल. रामनवमी निमित्त येथे आम्ही काही मंत्र देत आहोत, त्या मंत्रांचा किंवा एक मंत्र देखील जपल्यास भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात.
'राम'
हे मंत्र स्वत:मध्ये पूर्ण असून शूची-अशूची अवस्थेत जपू शकता. याला तारक मंत्र म्हणतात.
'रां रामाय नम:'
सकाम जपत असलेले हे मंत्र राज्य, लक्ष्मी पुत्र, आरोग्य आणि विपत्ती नाश या साठी प्रसिद्ध आहे.
'ॐ रामचंद्राय नम:'
क्लेश दूर करण्यासाठी प्रभावी मंत्र
'ॐ रामभद्राय नम:'
कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रभावी आहे.
'ॐ जानकी वल्लभाय स्वाहा'
प्रभू कृपा प्राप्तीसाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी जपावे.
'ॐ नमो भगवते रामचंद्राय'
विपत्ती-आपत्ती निवारणासाठी जपावे.
'श्रीराम जय राम, जय-जय राम'
सर्वोत्तम कधीही जपण्यायोग्य मंत्र.
श्रीराम गायत्री मंत्र 'ॐ दशरथाय नम: विद्महे सीता वल्लभाय धीमहि तन्नो राम: प्रचोदयात्।'
सर्व संकट नष्ट करण्यासाठी आणि ऋद्धी-सिद्धी देणारे मंत्र मानले गेले आहे.
'ॐ नम: शिवाय', 'ॐ हं हनुमते श्री रामचंद्राय नम:।'
या मंत्रामुळे अनेक कार्यांमध्ये यश मिळतं.
'ॐ रामाय धनुष्पाणये स्वाहा:'
शत्रू शमन, न्यायालय, खटला इतर समस्यांपासून मुक्ती देतं.
सर्वसाधारणपणे हनुमानाचे मंत्र उग्र असतात. महादेव आणि राम मंत्रासोबत जपल्याने त्यांची उग्रता नाहीशी होते.
रामरक्षास्तोत्र, सुंदरकांड, हनुमान चालीसा, बजरंग बाण इतर जपून अनुष्ठान रूपात लाभ प्राप्त करता येऊ शकतं.