Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 17 April 2025
webdunia

रामनवमी शुभेच्छा संदेश मराठी Ram Navami 2025 Wishes in Marathi

Ram Navami
, शनिवार, 5 एप्रिल 2025 (21:35 IST)
छंद नाही रामाचा तो देह
काय कामाचा,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम
रघुवंशनाथम, कारुण्यरुपं
करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर..
अरे मानवा जरा प्रभू रामांच्या
विचाराची कास धर..
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
शुभ दिवस आहे राम जन्माचा
चला करुया साजरा,
तुम्हाला सगळ्यांना
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
रामाप्रती भक्ती तुझी  ।
राम राखे अंतरी  ।
रामासाठी भक्ती तुझी ।
राम बोले वैखरी ।
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
ALSO READ: राम नवमीला या पद्धतीने राम रक्षा स्तोत्र पाठ करा
प्रभू रामांच्या चरणी लीन
राहाल तर
आयुष्यात कायम सुखी राहाल..
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे,
राम सर्वस्व आहे..
राम सुरुवात आहे आणि
राम शेवट आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम,
एकैकं अक्षरं पुसां,
महापातकनाशकम,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा,
मातृ-पितृवचनी पुत्र आणि
एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
अंश विष्णूचा राम धरेची दुहिता
ती सीता गंधर्वाचे सूर लागले
जय गीतं गाता आकाशाशी
जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
 
ज्यांचा कर्म धर्म आहे
ज्यांची वाणी सत्य आहे
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा
कृष्ण आवश्यक आहे,
तसाच प्रत्येकाच्या मनात,
मर्यादा पुरुषोत्तम
राम असणं आवश्यक आहे…
श्रीराम नवमीच्या हार्दिक  शुभेच्छा!
 
मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या
जीवनातून आपल्याला विचार,
शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता
आणण्यासाठी प्रेरणा मिळो.
श्रीराम नवमीच्या हार्दिक  शुभेच्छा!
 
प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता,
मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता
आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी
आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी
श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या
आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप
खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद
सदैव तुमच्यासोबत असू द्या.
तुमचे घर कायम आनंद,
सौभाग्याने भरलेले राहू द्या.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची
सुरुवात नेहमीच मिळेल आनंद
आणि आयुष्यात होईल भरभराट,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
श्री राम आपल्या आयुष्यात आनंद,
ऐश्वर्य आणि स्थिरता
आणो ही प्रार्थना,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Edited By - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शनिवारची आरती