अल्लाह हा एकच इश्वर असून कोणीही त्यापेक्षा वरचढ नाही. (ला इल्ह् हिल्लल्लाह् )
मुहम्मद हा अल्लाहचा शेवटचा प्रेषीत आहे. (महम्मदे रसूल-अल्लाह)
अल्लाह निराकार असून इस्लाममध्ये अल्लाहला इतर कोणत्याही स्वरुपात पूजणे मना आहे.
दिवसातून पाच वेळा नमाज पढणे
आयुष्यातून एकदा मक्केला भेट देणे. (हज)
आपल्या मिळकतीतील १/४० मिळकत गोरगरीबांसाठी दान करणे. (जकात)
इस्लाम हा शब्द अरबी भाषेतील असून मूळ शब्द अस्लम (अस् + अलम) असा आहे, ज्याचा शब्दश: अर्थ शरणागती पत्करणे व भावार्थ परमेश्वरापुढे शरणागती पत्करणे व त्या परमेश्वराला सर्वशक्तीमान म्हणून पुजणे. इस्लामच्या साधकाने इस्लामवरची श्रद्धा ही दाखवलीच पाहिजे त्यासाठी साधकाने परमेश्वराला पुजले पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत व अन्य कोणत्याही देव देवतांना ( अनेकेश्वरवाद) पुजले नाही पाहिजे.
मुस्लिमांची अशी श्रद्धा आहे कि परमेश्वराने ( अल्लाहने) मुहम्मद पैगंबरा करवी कुराण उलगडवले. याकामी गॅब्रिएल या देव दूताने मदत केली व अश्या रितीने कुराण व मुहम्म्द पैंगबरांच्या चाली रिती व बोली ( सुन्नाह) इस्लामनुसार मूळ प्रमाण मानले जातात. तसेच इस्लाम हा नवीन धर्म नसून मुहम्मद पैंगबराकरवी अल्लाह ने अनादी कालापासूनच्या एकेश्वर धर्माचे पुनरुत्थान केले अशी मान्यता आहे. इस्लामच्या आगोदरचे एकेश्वरवादी अब्राहमीक धर्म जे आज यहुदी व ख्रिस्ती धर्माने ओळखले जातात त्यांनी परमेश्वराने पाठवलेल्या आज्ञांचा, साक्षात्कारांचा चुकीचा व सोईचा अर्थ लावून पुर्वीचे धर्म ग्रंथ बदलले असे मानतात व खर्या एकेश्वर धर्माची मुहम्मद द्वारे पुनरुत्थान झाल्याचे इस्लामचे साधक मानतात.
इस्लाम मध्ये अनेक चालीरिती आहेत. इस्लामच्या साधकांना इस्लामचे पाच स्तंभ पाळावे लागतात. जी प्रमुख पाच कर्तव्ये आहेत ज्यांनी संपूर्ण मुस्लीम समाजाला बांधले आहे. या पाच स्तंभापलिकडे इस्लाम मध्ये इस्लामी समाजासाठी काळानुसार कायदे प्रणाली तयार झाली आहे ज्याला शरीयत कायदेप्रणाली असे ओळखले जाते. शरीयत कायदेप्रणाली मध्ये मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच चालिरिती व समाजाच्या सर्व अंगांना इस्लामी कायद्याच्या चौकटीत बसवून समाज जीवन शिस्तबद्ध केले आहे असे इस्लामचे साधक मानतात.
इस्लामचे दोन प्रमुख पंथ आहेत. शिया व सुन्नी. यातील सुन्नींचे प्रमाण जास्त असून एकूण इस्लामी लोकसंख्येच्या ८५ टक्के आहेत. तर उर्वरित १५ टक्के शिया व इतर पंथात मोडतात. या पंथातही अनेक उपप्रकार आहेत. शिया व सुन्नी ही मुहम्मद पैंगबराच्या म्रुत्यूनंतर इस्लाममध्ये धार्मिक व राजकिय वारसदार कोण याचा प्रश्न उद्भभवला होता. पहिल्या तीन खलीफांना मानणारे सुन्नी पंथाचे झाले तर चौथे खलीफांना मानणारे शिया पंथिय बनले.