Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंदीतूनही मजबूत होऊन बाहेर पडू - पंतप्रधान

मंदीतूनही मजबूत होऊन बाहेर पडू - पंतप्रधान

वार्ता

नवी दिल्ली , शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2008 (15:10 IST)
जागतिक मंदीतूनही भारत मजबूत होऊन सहीसलामत बाहेर पडेल, असे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आठ टक्के विकासदरही कायम राहील असा विश्वास व्यक्त केला.

हिंदूस्तान टाईम्सच्या 'लीडरशिपट समीट'मध्ये ते बोलत होते. ''देशात आणि जागतिक पातळीवरही आम्ही विकासात्मक काम करू. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आमचे कौशल्य उपयोगी पडेल. जे देश फक्त आपल्यापुरते पाहतील आणि आपल्याच प्रश्नात अडकतील त्यांचे पतन होईल. त्यांना यश मिळणार नाही,'' असे सांगून पंतप्रधान म्हणाले, की आज जग एकमेकांत गुंतले गेले आहे. एक देश दुसर्‍यावर अवलंबून राहिला आहे. हे परस्परावलंबित्व आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे. म्हणूनच दुसरा देश म्हणजे एखादे स्वतंत्र बेट नाही हेही समजून घ्यायला हवे.

Share this Story:

Follow Webdunia marathi