इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या याहू इंडिया कंपनीलाही आर्थिक मंदीचा फटका बसला असून, कंपनीतही नोकर कपात सुरू झाली आहे.
आपल्या 60 कर्मचाऱ्यांना काढण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले असून, आतापर्यंत कंपनीने आपल्या भारताबाहेरील 1500 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धेत टिकण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.