जागतिक आर्थिक मंदीचा फटका अंबानींच्या रिलायन्स समूहालाही बसला असून, आगामी काळात रिलायन्स आपल्या पाच हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे वृत्त आहे.
कंपनीने आपल्या विविध विभागातील जवळपास पाच हजार कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितले असल्याची माहिती मिळाली आहे. रिलायन्स रिटेलमध्ये सर्वाधीक कपात होण्याची शक्यता आहे.
कंपनीने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिला नाही. परंतु आर्थिक मंदी अधिक गडद झाल्यास अशा स्वरूपाचे पाऊल उचलणे भाग असल्याचे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.