आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी 20 हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारला सुमारे 40 हजार कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागणार आहे.
सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना जास्तीत जास्त निधी वितरीत करण्याकरता कर्ज वाटपाच्या लक्ष्यात वाढ करण्याचे निर्देश सरकारने दिले असून महागाईचा दर कमी झाल्याने कमीत कमी व्याजदरात अधिक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत.
नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेक सिंह अहलूवालिया यांनी रिजर्व बँकेच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणा केल्यानंतर काहीच वेळेत या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. यापूर्वीच सरकाने 20 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असून आता दुस-या टप्प्यातही तितकेच पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे आजारी वाहन आणि बँकिंग क्षेत्राला दिलासा मिळणार आहे.