Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंदी रोखण्यात पंतप्रधानांना अपयश- भाजप

मंदी रोखण्यात पंतप्रधानांना अपयश- भाजप

वार्ता

जागतिक आर्थिक मंदीचा फटका भारतालाही बसला असून, देशाचे पंतप्रधान मोठे अर्थतज्ज्ञ असतानाही देशाला हा फटका बसल्याने पंतप्रधानांचे अपयश उघड झाल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे.

भाजप सरचिटणीस अरुण जेटली यांनी आज नियमित पत्रकारपरिषदेत पंतप्रधानांच्या आर्थिक धोरणावर टीका केली.

अर्थमंत्री पी चिदंबरम आणि स्वतः: पंतप्रधान अर्थतज्ज्ञ असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेला आर्थिक मंदीचा फटका बसला असून, भारतावर आलेले संकट रोखण्यात उभय नेत्यांना अपयश आल्याचा आरोप जेटली यांनी या प्रसंगी केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi