Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अबु जुंदाल न्यायालयात

अबु जुंदाल न्यायालयात

वेबदुनिया

अत्यंत कडेकोट बंदोबस्तात मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना मार्गदर्शन करणारा दहशतवादी अबू जुंदाल याला शनिवारी सकाळी मुंबईत आणल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. दिल्लीतील एका न्यायालयाने शुक्रवारीच त्याची रवानगी दहशतवादविरोधी पथकाकडे केली आहे. महाराष्ट्रात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांप्रकरणी त्याची चौकशी करता यावी, यासाठी एटीएसने त्याच्या कोठडीची मागणी केली होती.

सकाळी विमानाने त्याला मुंबईत आणताच काळाचौकी पोलिस ठाण्यात ठेवले होते. तेथून त्याला मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi