Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आघाडी सरकारचा भ्रष्टाचार जनतेसमोर मांडा- नरेंद्र मोदी

आघाडी सरकारचा भ्रष्टाचार जनतेसमोर मांडा- नरेंद्र मोदी
मुंबई , मंगळवार, 22 जुलै 2014 (15:25 IST)
राज्यात आघाडी सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे पेव फुटले  आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा भ्रष्टाचार राज्यातील  जनतेसमोर मांडल्यानंतर तुम्हाला विजयापासून कोणी रोखू शकत  नसल्याचा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदेश भाजपच्या  कार्यकर्त्यांना दिला. नरेंद्र मोदी यांनी प्रदेश भाजपच्या कार्यकर्त्यांना  संबोधित करत होते.
 
नरेंद्र मोदी सोमवारी दुपारी मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्राला भेट  देण्यासाठी आले होते. पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्याच मोदी मुंबईत  आले होते. यावेळी मोदींनी ग्रॅड हयात या हॉटेलमध्ये राज्यातील  निवडक पन्नास पदाधिकार्‍यांची भेट घेतली. उत्तम संघटक बनण्याचा  कानमंत्री मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. राज्यातील आगामी  विधानसभा निवडणुक कशा लढायच्या याचा निर्णय स्थानिक नेतृत्त्व  घेईल. त्यात केंद्रीय नेतृत्त्व ढवळढवळ करणार नसल्याचेही मोदींनी  सांगितले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi