Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आजपासून बारावीची परीक्षा

आजपासून बारावीची परीक्षा

वेबदुनिया

नवी मुंबई , मंगळवार, 21 फेब्रुवारी 2012 (12:28 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी 29 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई विभागातील 198 केंद्रे व 481 उपकेंद्रांवर या परीक्षा घेण्यात येणार आहेत. मुंबई विभागातून सुमारे 3 लाख 11 हजार 845 विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट होत आहेत. यामध्ये विज्ञान शाखेतून 8क् हजार 279, कला शाखेतून 49 हजार 999, वाणिज्य शाखेतून 1 लाख 76 हजार 6क्8 व एमसीव्हीसी शाखेतील 4 हजार 959 विद्याथ्र्याचा समावेश आहे. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी 29 भरारी पथके, 3 महिला विशेष पथके कार्यरत राहणार आहेत. 5 व्हीडीओ पथके या काळात परीक्षा केंद्रावर नजर ठेवून असणार असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव आर. आर. भिसे यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi