Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आठ राजकीय पक्षांना नोटीसा

आठ राजकीय पक्षांना नोटीसा
मुंबई: राज्य निवडणूक आयोगानं आठ राजकीय पक्षांना नोटीसा पाठवल्या आहेत. वारंवार मागण्या करुनही कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळं या नोटीसा पाठवल्या आहेत.यात सत्ताधारी भाजपचाही समावेश आहे.
 
या पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही तर येत्या काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत पक्षांना त्यांचं आरक्षित चिन्ह देखील गमवावं लागू शकतं. आयकर विवरण पत्र आणि लेखा परीक्षणाची प्रत सादर न केल्यामुळं निवडणूक आयोगानं भाजप, जनता दल सेक्युलर, जनता दल युनायटेड, इंडियन युनियम मुस्लिम लीगसह 8 पक्षांना नोटीस पाठवली आहे. 
 
9 सप्टेंबर पर्यत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न केल्यास पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा इशारा निवडणूक आयोगानं दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इराणींच्या साड्यांचे बिल देण्यास वस्त्रोद्योग मंत्रालयाचा नकार