Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आदर्श: दोषींविरुध्द गुन्हा दाखल करा: भाजप

आदर्श: दोषींविरुध्द गुन्हा दाखल करा: भाजप
मुंबई- आदर्श सोसायटीची 31 मजली इमारत जमीनदोस्त करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर भाजपने या प्रकरणातील दोषींविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास केल्यानंतर प्रतिक्रिया देण्यात येईल, अशी सावध भूमिका घेतली आहे. 
 
2010 मध्ये अशोक चव्हाण यांना आदर्श प्रकरणामुळेच मुख्मंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले होते. मुंबईच्या भाजप शाखेचे अध्यक्ष आशिष शेलार यंनी दोषींविरुध्द एफआयआर दाखल करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. 
 
शेलार यांनी म्हटले आहे की, आदर्शप्रकरणी फेरचौकशी करण्याऐवजी सर्वप्रथम गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, सत्ताधारी पक्षाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि भाजपचे राज्सभेतील खासदार अजय संचेती यांच्याविरुध्द कोणती कारवाई करणार आहे याचे उत्तर प्रथम दिले पाहिजे. प्रभू आणि संचेती यांच्या नातेवाईकांना आदर्श सोसाटीत सदनिका मिळालेल आहेत. केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी सर्वप्रथम आदर्श इमारत पाडण्याचा आदेश दिला होता, असा दावा सावंत यांनी केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गर्जा महाराष्ट्र माझा