राज्य मंत्रिमंडळाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सहकारमंत्री पतंगराव कदम, अन्न पुरवठा मंत्री सुनील तरकटे, सहकार राज्यमंत्री जयप्रकाश मुंदडा, जलसंपदा मंत्री अजित पवार, अर्थमंत्री जयंत पाटील, शिक्षणमंत्री वसंत पुरके, गणेश नाईक, विजयसिंह मोहिते पाटील, अशा मंत्री महोदयांचे स्थान दोन अपत्यांवर 'फुलस्टॉप ' लावणार्यामद्ये लागते. एकूणच विलासराव देशमुख मंत्रिमंडळ या आघाडीवर तरी समाधानकारक कामगिरी करणारे ठरले आहे.तीन अपत्ये असणार्यांमध्ये सुमारे ८९ आमदारांचा समावेश मुख्यमंत्री विलासराव देशमुख, यांच्यासहित आहे. औरगाबादचे (पूर्व) डॉ. कल्याण काळे, कळमनुरीचे शिवसेना आमदार गजानन धुधे, किनवटचे राष्ट्रवादी आमदार प्रदीप जाधव, पाथरीचे बाबाजानी दर्रानी, बंधारचे अपक्ष प्रतापराव पाटील, गंगापूरचे अण्णासाहेब माने, औसाचे दिनकर माने, परतुरचे बबनराव लोणीकर, मुखेडचे सुजान साबणे, हदगावचे सुभाष वानखेडे यांचा 'तीन' अपत्यांच्या यादीत समावेश आहे. विरोधीपक्ष नेते रामदास कदम, जगानन किर्तीकर, एकनाथ खडसे, वामनराव चटप, सुरेशदादा जैन, बबनराव पाचपूते, संदीपान भुमरे, या आमदारांनी तीन मुलांवरच कुटुंब नियोजन करुन घेतले.असे आहे आमदारांचे फॅमिली प्लॅनिंग फक्त एक अपत्यः ४२ आमदारराजेश टोपे, भास्करराव पाटील खतगावकर, डॉ. विमल मुंदडा, दिलीप वळसे पाटील, राजेंद्र शिंगणे, छगन भुजबळ, रणजित कांबळे आदी.फक्त दोन अपत्येः ९८ आमदारसचिन अहिर, विनय कोरे , बब्रुवान खंदाडे, अर्जून खोतकर, दयानंद गायकवाड, रविंद्र गायकवाड, अशोक चव्हाण, सुनील तटकरे, राजेंद्र दर्डा, चंद्रकात दानवे, जयप्रकाश दांडेगावकर, सुरेश धस, गणेश नाईक, अमरसिंह पंडित, नामदेव पवार, पद्मसिंह पाटील, कृपाशंकर सिंह आदी. तीन अपत्ये- ८९ आमदार डॉ. कल्याण काळे, बाबाजानी दुर्रानी, अण्णासाहेब माने, बबनराव लोणीकर, सुभाष साबने, एकनाथ खडसे, संदीपान भुमरे आदी.
आदर्श पालकत्व
देशात स्त्री भ्रुणहत्येचे प्रमाण वाढले असून मुलीचा जन्म अनेक कुटंबांना नकोच वाटतो. अशा परिस्थितीत ३६ आमदारांनी मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी तीन मुलींवर समाधान मानले. अशोक चव्हाण यांनाही दोन, परभणीचे शिवसेना आमदार संजय जाधव यानां एक, उर्जामंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही एक मुलगी आहे. थोडक्यात ' वंशाचा दिवा' शोधण्याच्या भानगडीत न पडता मुलींवरच विश्वास दाखवून त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.
दहा अपत्यांचे पिता
प्रत्येक बाबतीत अपवाद आढळतातच. तीन अपत्यांपर्यंत ठिक आहे. परंतु दहा मुलांना जन्म देणारे आमदारही विद्यमान विधानसभेत आहेत. अलिबाचे काँग्रेसचे मधुकर ठाकूर असे हे फारसे चर्चेत नसणारे आमदार. काँग्रेसचेच नवापूरचे आमदार सुरुपसिंह नाईक यांना आठ मुलं आहेत. बीड जिल्ह्यातील चौसाळ्याचे भाजप आमदार केशव आंधळे व मालेगावचे काँग्रेस आमदार शेख रशीद हाजी हे सात मुलांचे पिता आहेत. सामाजिक न्याय मंत्री काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, भोकरचे राष्ट्रवादी आमदार श्रीनिवास देसाई व जव्हारचे माकर्सवादी आमदार राजाराम ओझरे सहा अपत्यांचे पालक आहेत.तब्बल १४ आमदारांना पाच तर ३० आमदारंना चार अपत्ये आहेत.