आयुध निर्माणी भंडारा येथे आर. के. सेक्सनमधील आर -१ इमारतींमध्ये रॉकेट बनविण्यासाठी लागणारा कच्चामालएनजी पेस्टमध्ये ३० ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता झालेल्या शक्तिशाली स्फोटात ८० टन बारूद साहीत्यासह ४० कोटी रूपयाचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
या इमारतीमंध्ये तिसर्या पाळीदरम्यान जवळपास १५० कर्मचारी कार्यरत असतात. हा स्फोट झाला त्यावेळी कुठलाही कर्मचारी कार्यरत नसल्याने सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली. या प्रकरणाच्या तपासासाठी आयुध निर्माणीच्या महाप्रबंधकांनी एक तपासणी पथकाची नेमणूक केली आहे.