Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरएसएसची हाफ पँट होणार हद्दपार

आरएसएसची हाफ पँट होणार हद्दपार
नागपूर , सोमवार, 29 ऑगस्ट 2016 (15:41 IST)
विजयादशमीपासून आरएसएसचे स्वयंसेवक हाफ नव्हे तर फुल पँटमध्ये दिसणार आहेत. आरएसएसची ओळख बनलेली हाफ पँट आता हद्दपार होणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे तरुण वर्ग आकर्षित होत आहे. यामुळे गणवेशातही बदल व्हावा, असा मतप्रवाह झाला. त्यानंतर गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात राजस्थानच्या नागौरमध्ये झालेल्या संघाच्या सभेत गणवेश बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पांढरा सदरा, काळी टोपी, कमरेला पट्टा, पायात बूट, हातात काठी आणि तपकिरी रंगाची फुल पँट असा आरएसएसचा नवा गणवेश असेल. नागपुरातील रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिरात संघाचा नवा गणवेश विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विनेशसाठी राष्ट्रपती खाली उतरले!