Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंदू मिलची जागा अखेर मिळाली

इंदू मिलची जागा अखेर मिळाली
दिल्ली , सोमवार, 6 एप्रिल 2015 (11:01 IST)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी मुंबईतील (दादर) इंदू मिलची १२ एकर जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विनंतीवरून पंतप्रधान मोदी यांनी जमीन हस्तांतरणाचा त्रिपक्षीय करार केला.
 
केंद्र सरकारच्या मान्यतेने राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ (एनटीसी) ही जागा राज्य सरकारला हस्तांतरित करणार आहे. काँग्रेस सरकारच्या काळात तत्कालीन वस्त्रोद्योगमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी इंदू मिलची जमीन डॉ. आंबेडकर स्मारकाकरिता देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याकरिता संसदेत कायदा करावा लागेल, अशी भूमिका त्या वेळी घेतली गेली होती. या जागेच्या किमतीऐवजी टीडीआर देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली होती. राज्य शासनाने याबाबत महाधिवक्त्यांचे मत घेतले होते. संसदेत कायदा करण्याची गरज नाही. केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीने एनटीसी ही जागा राज्य सरकारला देऊ शकते, असा अभिप्राय दिला.
 
दरम्यान, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस व वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोष गंगवार यांच्या उपस्थितीत याबाबतच्या त्रिपक्षीय करारावर एनटीसीचे अध्यक्ष व प्रबंध संचालक पी. सी. वैश व महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त यांनी स्वाक्षर्‍या केल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi