Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक्स्प्रेसवेवर अपघात रोखण्यासाठी स्पेशल पोलीस फोर्स

एक्स्प्रेसवेवर अपघात रोखण्यासाठी स्पेशल पोलीस फोर्स
मुंबई , शुक्रवार, 29 जुलै 2016 (10:31 IST)
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या सुरक्षिततेबाबत विधानभवनात  बैठक पार पडली. एक्स्प्रेस वेवरील अपघात रोखण्यासाठी 100 जणांची विशेष तुकडी तत्काळ नियुक्त करून त्यांना स्पेशल पोलीस फोर्सचा दर्जा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

एक्सप्रेस वेवर लेन कटिंग, ओव्हर स्पीडिंग आणि ओव्हरटेकमुळे अपघातांचं प्रमा वाढत आहे. त्यामुळे याचं मॉनिटरिंग करण्यासाठी आता ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्याचा सरकारचा विचार आहे.

या बैठकीला एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृह राज्य मंत्री दीपक केसरकर, अजित पवार आणि एक्सप्रेस वे परिसरातील आमदार उपस्थित होते.पावसाळ्यात ड्रंक अँन्ड ड्राईव्हच्या केसेस वाढतात.

ज्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत. यावर जरब बसवण्यासाठी पावसाळ्यात फ्लाईंग स्क्वॉडची संख्या वाढवण्याची सूचना एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज संप; बँका 3 दिवस सलग बंद