Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 19 February 2025
webdunia

एसटी बसमध्येही आता वायफाय!

एसटी बसमध्येही आता वायफाय!
मुंबई , शुक्रवार, 19 ऑगस्ट 2016 (10:56 IST)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हे हायटेक पाऊल उचलले आहे. एसटी बसमध्येही आता वायफाय सुविधा मिळणार आहे. प्रवासात सिनेमे, गाणी, बातम्या ऐकायला आणि बघायला मिळाव्यात, हा या सुविधेमागे उद्देश आहे.

सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरु केलेली ही सुविधा लवकरच महाराष्ट्रभरातील एसटीबसेसमध्ये सुरु केली जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी दिली.
प्रवाशांचं व्यक्तिगत मनोरंजन, हे या सुविधेच उद्दिष्ट असून, प्रायोगिक तत्त्वावर पुण्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट डेपोतील 50 शिवनेरी, हिरकणी आणि परिवर्तन बसेसमध्ये वायफाय यंत्र बसवण्यात येणार आहे. वायफाय सुरु झाल्यानंतर मराठी, हिंदी, इंग्रजी, सिनेमे, गाणी, बातम्या, लहान मुलांसाठी कार्टून, टीव्ही वाहिन्यांवरील गाजलेल्या मालिका असा मनोरंजनाचा खजिना उघडला जाईल. प्रत्येक प्रवाशाला त्यांच्या पसंतीनुसार त्यापैकी काहीही बघणे आणि ऐकणे शक्य होणार आहे. दर 15 दिवसांनी मेन्यू पुन्हा रिफ्रेश केला जाईल आणि नवीन गाणी, सिनेमे वायफाय कंपनीद्वारे उपलब्ध करुन दिले जातील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

18 वर्षांखालील गोविंदा दहीहंडीत नकोत : सर्वोच्च न्यायालय