Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एसटी मेकॅनिकची गळफास लावून आत्महत्या

एसटी मेकॅनिकची गळफास लावून आत्महत्या
उस्मानबाद , बुधवार, 2 मार्च 2016 (11:20 IST)
एसटी मेकॅनिकने डेपोमध्ये उभ्या असलेल्या एका बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कामाच्या तणावातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
 
लातूरला बस घेऊन जाण्यासाठी बस ड्रायव्हर व कंडक्टर बसमध्ये चढले असता, बसमध्येच एका कर्मचा-याचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. हा मृतदेह एसटी डेपोत मेकॅनिकचे काम करणा-या इसमाचा असून त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi