Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑक्टोबरचा आज ऑनलाईन निकाल

ऑक्टोबरचा आज ऑनलाईन निकाल
पुणे , मंगळवार, 25 नोव्हेंबर 2014 (16:28 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या ऑक्टोबर परीक्षेचा निकाल आज मंगळवारी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. विद्यार्थ्यांनी मोबाईल तसेच वेबकॅफेवर निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती. संकेतस्थळावर निकाल पाहिल्यानंतर उपलब्ध गुणांची प्रिंट आऊटही घेण्यात येत होती. नऊ विभागीय मंडळामार्फत १८ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. तर बारावी परीक्षा १८ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात आली. विद्यार्थ्यांना ४ डिसेंबर रोजी सकाळी शाळा, महाविद्यालयांत गुणपत्रिका मिळणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi