Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कच्च्या कैद्यांना मतदानाचा अधिकार नाहीच

कच्च्या कैद्यांना मतदानाचा अधिकार नाहीच
नागपूर , मंगळवार, 30 सप्टेंबर 2014 (12:23 IST)
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार कोर्टात खटला सुरू असलेल्या तुरुंगातील कच्चे कैदी कोणत्यांही वडणूक प्रक्रियेत मतदान करू शकणार  नसल्याचा निर्वाळा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
 
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला मतदान करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी अमरदीपसिंग ठाकूर या कैद्याने केली होती. ठाकूर नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. 
 
मात्र, कायदेशीर कारवाईमुळे एखाद्या व्यक्तीचा मतदानाचा अधिकार देता येणार नसल्याने कोर्टाने ठाकूरची  विनंती फेटाळून लावली. दरम्यान, कारागृहातील कैद्यांना बाहेर जाऊन मतदान करता येत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi