Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कर्नाटकातील पोलीस पथक पुण्यात

कर्नाटकातील पोलीस पथक पुण्यात
पुणे , गुरूवार, 3 सप्टेंबर 2015 (10:43 IST)
पुरोगामी विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासासाठी हुबळी-धारवाडचे पोलीस पथक पुण्यात दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास सुरु झाला आहे.
 
कलबुर्गी यांच्या हत्येची घटना डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या घटनांमध्ये काहीसे साधर्म्य आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी कर्नाटकातील पोलीस पथकाने डॉ. दाभोलकर यांची हत्या झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. याप्रकरणाचा तपास करणार्‍या  अधिकार्‍यांशीही चर्चा केल्याची माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त सी. एच. वाकडे यांनी दिली. दरम्यान, या पथकाने सराईत गुन्हेगार तसेच कारागृहातील गुन्हेगारांबद्दलची माहितीही घेतल्याचे सांगण्यात आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi