Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॉँग्रेसबरोबर ‘स्वाभिमानी’कडूनही सरकारची कोंडी

कॉँग्रेसबरोबर ‘स्वाभिमानी’कडूनही सरकारची कोंडी
पुणे , सोमवार, 24 नोव्हेंबर 2014 (10:54 IST)
दुष्काळाच्या धळा सोसत आत्महत्येला कवटाळणाºया विदर्भ व मराठवाड्यातील शेतकºयांसाठी मदत जाहीर करावी या मागणीसाठी  आंदोलन छेडण्याचा इशारा कॉँग्रेसने दिला असतानाच याच मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे. मित्रपक्षाकडूनच धमकीवजा इशारा मिळाल्याने शेट्टी यांच्याकडून सरकारची कोंडी केली जात असल्याचे बोलले जात आहे.
 
विधिमंडळाचे अधिवेशन ८ आठ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. नागपुरात झालेल्या बैठकीत कॉंग्रेसने शेतकºयांसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर पुण्यात पत्रकारांशी बोलताना ‘स्वाभिमानी’चे नेते शेट्टी यांनी याच मुद्यावर आंदोलनाचा इशारा दिला. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्‍यांना  दुष्काळामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने त्वरित पॅकेज जाहीर करावे, अन्यथा रस्त्यावर उतरु, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi