गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर 2 ते 4 सप्टेंबरपर्यंत टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय एमएसआरडीसीनं घेतला आहे.
कोकणात जाणाऱ्या वाहनांना सूट मिळविण्यासाठी नजीकच्या वाहतूक पोलिस आणि आरटीओ कार्यालयातून पास घ्यावे लागणार आहेत. गाडीचा क्रमांक, स्थानिक पत्ता यांचा पुरावा द्यावा लागणार आहे. तसेच कोकणात जाणाऱ्या घराचा पत्ताही द्यावा लागणार आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या पास धारकांनाच मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर टोल सूट मिळणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकडून टोल वसुली करण्यात येऊ नये अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली होती.