Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोकण काळवंडलं, रिमझिम सुरु...

कोकण काळवंडलं, रिमझिम सुरु...
पुणे , मंगळवार, 7 जुलै 2015 (11:05 IST)
विश्रांती घेतलेला मान्सून राज्यात पुन्हा सर्किय होण्याची चिन्हे असून कोकणात काही ढिकाणी ढगांच्या गर्दीसह रिमझिम धारांना सुरुवात झाली आहे. पावसासाठी देव पाण्यात घातलेल्या बळीराजासाठी ही ‘गुड न्युज’ आहे.

दडी मारून असलेला पाऊस बुधवारपासून कोकणात पुन्हा बरसण्यास सुरूवात होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला होता. त्यानुसार कोकणात  पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत.  अरबी समुद्रात केरळपासून गुजरातपर्यंत किनारपट्टीच्या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा हळूहळू सक्रिय होत आहे. त्यामुळे कोकणात पावसास जोर वाढेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi