Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोल्हापुरात मंडलिक-शेट्टी यांची महाआघाडी

कोल्हापुरात मंडलिक-शेट्टी यांची महाआघाडी
कोल्हापूर (हिं.स) , बुधवार, 17 जून 2009 (16:48 IST)
आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय झुंडशाही विरोधात शेतकरी संघटना, जनता दल, शेकाप, यांच्यासह महाडिक यांची मदत घेऊन महाआघाडी उभारणार असल्याचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने तिकिट नाकारल्यानंतर बंडखोरी करून मंडलिक निवडून आले असून त्यांनी आता जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस संपविण्याचा विडा उचलला आहे.

केंद्रातील काँग्रेस सरकारला आपण तत्वावर पाठिंबा दिला आहे. पण कॉंग्रेसमध्ये कदापि प्रवेश करणार नाही, असे मंडलिक यांनी ठामपणे सांगितले. केंद्रात काँग्रेसला पाठिंबा मग जिल्ह्यात विरोध का? या प्रश्नावर मंडलिक यांनी केंद्रात पाठिंबा दिला असला तरी जिल्ह्यातील राजकीय झुंडशाही मोडून काढण्यासाठी आपण (मंडलिक, शेट्टी, महाडिक तसेच मित्र पक्ष ) सर्वसामान्य उमेदवारांना मैदानात उतरवून लढा देणार असल्याचे उत्तर त्यांनी दिले. माझ्या विजयासाठी स्वाभिमानी संघटना जनता दल, यांच्याप्रमाणेच धनंजय महाडिक व त्यांच्या पत्नी अरुंधती महाडिक यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सांगत मंडलिक यांनी महाडिक येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार असतील असे संकेत दिले.

गुळाला आतंरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्यासाठी लवकरच व्यापक प्रमाणात गुळ परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यानी यावेळी सांगितले. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार उत्पादन पॅकिंग करुन गुळाला व्यापक बाजारपेठ मिळण्यासाठी गुळ परिषदेत तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन केले जाईल. तसेच त्यानुसार कायमस्वरुपी सन्वयक मार्गदर्शक कक्षही उभारला जाईल, असे मंडलिक यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi