Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खडसे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात सन्नाटा

खडसे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात सन्नाटा
मुंबई , बुधवार, 25 मे 2016 (11:13 IST)
राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सुरू झाल्यानंतर गेल्या आठ दिवसात त्यावर बर्‍याच उलटसुलट चर्चा झाल्या. नेहमी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालयात नियमित कामकाज करण्यासाठी हजर राहणार्‍या खडसे यांच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयात आज स्मशानशांतता होती. 
 
सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर खडसे मंत्रालात फिरकलेच नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांच्या अवतीभवती फिरणारी गर्दी देखील कमी झाल्याचे पाहायला मिळाले.
 
दरम्यान, खडसे यांनी पत्रकारांना मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाची माहिती देण्यास नकार देत असहकार पुकारला आणि तुम्हाला माझ्याबाबत जे काही वाटेल ते छापा  किंवा दाखवा मी आता शांत राहणार आहे असा संताप व्यक्त केला. त्यामुळे खडसे आता सरकारवर रुसल्याचे सांगितले जात आहे. राज्य मंत्रिमंडळातही आता खडसे यांच्या बाजूचे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बाजूचे असे दोन गट भाजपच्या मंत्रात पडले असल्याचे काही भाजप नेत्यांनी सांगितले. 
 
खडसे यांना दाऊद इब्राहीम यांच्या पाकिस्तानातील क्रमांकावरून फोन आले नाहीत असा खुलासा केल्यानंतरही आणि त्याला राज्याच्या पोलीस खात्याने पुष्टी दिल्यांनतरही खडसे यांच्या क्रमांकाच्या दूरध्वनीचा तपशील माध्यमातून देण्यात आल्याने खडसे यांना आता त्यावर काहीच खुलासा करायचा नाही असे त्यांचे म्हणणे आहे. खडसे यांच्या कार्यालयात लाच प्रकरणात नावे घेण्यात आलेल्या संशति अधिकार्‍यांना सध्या कामावरून दूर ठेवण्यात आले असून या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोपनिय अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला असून त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांना खडसे यांच्या कार्यालयातून तात्पुरत्या कारणासाठी दूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत अधिकृत पुष्टी करण्यास महसूलमंर्त्यांनी नकार दिला असून पत्रकारांना कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यास नकार दिला आहे. असे सांगण्यात आले की केंद्री मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेच्या जागेकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला त्यासाठी खडसे विधानभवनात आले होते मात्र त्यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात जाण्याचे टाळले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ब्रेड बनविणसाठी पोटॅशिम ब्रोमेट वापरण्यास बंदी