पुणे पोलिसांनी गॅंगस्टर बापू नायरला नवी दिल्लीतून अटक केली आहे. बापू हा पुण्यातील कुप्रसिद्ध गँगस्टर असून त्याच्यवर ‘मोका‘ खाली ही कारवाई झाली आहे. डिसेंबर २०१५ मध्ये त्याच्यावर कोंढव्यातील एकाची जागा बळकावून आठ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद आहे. या प्रकरणात बापूच्या साथिदारांना पोलिसांनी अटक केली होती, पण बापू फरार झाला होता.
खंडणीविरुद्ध पथकचा वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल पाटील आणि त्यांच्या पथकाने दिल्ली येथे बापूला अटक केली आहे.