Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोंदिया जिल्ह्याला भुकपांचा जोरदार धक्का

गोंदिया जिल्ह्याला भुकपांचा जोरदार धक्का
गोंदिया , शुक्रवार, 24 जुलै 2015 (16:06 IST)
सकाळपासूनच रिमझिम पावसाने गोंदियात सुरु केली त्यामुळे शेतकरी सुखावलेला असतानाच अचानक गोंदिया जिल्ह्याला सायकांळी ८.०५ ते ८.१० च्या दरम्यान आलेल्या भुकपांच्या झटक्याने पुर्ण गोंदिया जिल्हा हादरला गेला.गोंदिया शहराला दोनदा भुकपांचा धक्का बसला.पहिला धक्का हा ८.०५ ला तर दुसरा धक्का हा ८.०७ ला बसला आहे. आमगाव तालुक्यात ८.०८ मिनिटांनी गेल्या काही वर्षानंतर आलेला हा भुकपांचा सर्वात मोठा धक्का आहे.गोंदिया शहरातील नागरिक घराबाहेर पडले असून गावखेड्यात सुध्दा हिच परिस्थिती आहे.या भुकपामुळे अनेक घरांच्या इमारतींना व qभतीना भेगा पडल्या आहेत.गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हा झटका नागरिकांनी सहन केलेला आहे.

देवरी तालुक्यातील मुल्ला,तिरोडा तालुक्यातील बरबसपुरा,मुंडीकोटा,गोरेगाव तालुक्यातील दवडीपार,गोरेगाव ,सालेकसासह आमगाव तालुक्याला सुध्दा मोठा धक्का बसल्याची माहिती तेथील सुत्रांनी दिली.आमगाव,मुल्ला सह अनेक ठिकाणी मोठमोठी घरे व इमारती हलल्याचे वृत्त आहे.

दरम्यान गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षाशेजारी असलेल्या सभागृहात आज सकाळपासूनच मुकाअ दिलीप गावडे हे सर्व विभागप्रमुख ,बीडीओ आणि अधिकारी यांच्यासोबत समन्वय समितीच्या बैठकीत व्यस्त होते. भुकपांचा धक्का बसला त्यावेळी सुध्दा बैठक सुरु होती.भुकपांचा धक्का बसताच ही बैठक रद्द करुन सर्व अधिकारी व विभागप्रमुख सभागृह सोडून इमारतीच्या बाहेर पडले.

Share this Story:

Follow Webdunia marathi