Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोपीनाथ मुंडे भाजपचे महाराष्ट्र प्रभारी

गोपीनाथ मुंडे भाजपचे महाराष्ट्र प्रभारी
बीडचे खासदार व भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांची महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून निवड झाली आहे. आज शनिवारी सकाळी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे यापूर्वी राज्याचे प्रभारी म्हणून काम पाहात होते. मोदी यांच्या कार्यशैलीबाबत पक्षांतर्गत विविध मत प्रवाह निर्माण झाल्याने, प्रभारी पदाबाबत बदलांचे संकेत होते. राजनाथ सिंग यांनी आज मुंडे यांच्या नावाची घोषणा केल्याने आज त्यावर शिक्कामोर्तब झाले. राज्यात येऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच हा निर्णय झाल्याने, पक्षकार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi