Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घोड्यासाठी रुसून बसलेल्या नवरदेवाला बदडले

घोड्यासाठी रुसून बसलेल्या नवरदेवाला बदडले
यवतमाळ , शुक्रवार, 25 एप्रिल 2014 (11:15 IST)
लग्न वरातीत नवरदेवाला बसायला घोड्याऐवजी घोडी दिल्याच्या कारणावरून वधू-वर  पक्षांतील मंडळीत 'फ्रीस्टाईल' झाल्याची घटना जिल्ह्यातील दिग्रस शहरात गुरुवारी घडली. वधू पक्षातील मंडळीनी नवरदेवालाही बेदम मारहाण केल्याचे समजते.

मिळालेली माहिती अशी, की लग्नासाठी चांगला मुहूर्त असल्याने शहरातील बहुतेक मंगल कार्यालये बुक झाली होती. दरम्यान, बुटले महाविद्यालय परिसरातून दुपारी वरात जात असताना नवरदेवाला बसण्यासाठी घोडा न देता घोडी देण्यात आली. केवळ या कारणावरून वराकडील मंडळींनी वादाला सुरुवात केली. या क्षुल्लक कारणावरून वर-वधू पक्षात सुरु झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर क्षणात तुंबळ हाणामारीत झाले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही पक्षांकडील मंडळींची समजूत  काढत वाद सोडवला व लग्नकार्य पोलिसांच्या उपस्थितीत पार पडले. या भांडणात नवरदेवालादेखील  बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे उपस्थित वर्‍हाडी मंडळींना हसू आवरत नव्हते.

Share this Story:

Follow Webdunia marathi