Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप

चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप
मुंबई , सोमवार, 21 एप्रिल 2014 (11:14 IST)
मुंबईतील भांडुपमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून सात वर्षीय मुलीवर दोघांनी सलग दोन दिवस बलात्कार केल्याच्या घृणास्पद घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भांडुपमध्ये ड्रीम्स मॉल्सच्या मागे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ही मुलगी आईवडिलांसोबत भांडुप रेल्वे स्थानकात फलाटावर हे कुटुंब काही दिवसांपासून राहत आहे. पीडित मुलगी फलाटावर रडत बसली होती. तेव्हा क्षमा भाटकर या महिलेने तिला जवळ घेतले असता पीडितेला तिला आपबिती सांगितली. भाटकर यांनी तिला लगेच राजावाडी रुग्णालयात नेले. पीडितेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलीच्या जबाबानंतर कुर्ला रेल्वे पोलिसांनी दोघा आरोपींना अटक करून भांडुप पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi