Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चौकशीसाठी छगन भुजबळ आज ईडीसमोर

चौकशीसाठी छगन भुजबळ आज ईडीसमोर
मुंबई , सोमवार, 14 मार्च 2016 (09:54 IST)
महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) चौकशीसाठी हजर राहणार आहेत.
 
चौकशीला हजर राहण्याबाबत त्यांना आधीच समन्स बजावण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना सीबीआयनं अटकही केली. काही दिवस सीबीआय कोठडीत काढल्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधकाम कंत्राटात अफरातफर केल्याचा आरोप छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीरवर आहे. याशिवाय मुंबईतील कलिना विद्यापीठ भूखंड घोटाळा, अंधेरी आरटीओ, मुंबई-नाशिक टोल रोड, नवी मुंबईतील हेक्स वर्ल्ड हौसिंग प्रकल्पसारखे  9 विविध प्रकल्पात आपल्या जवळच्या नातेवाईकांना कंत्राट देऊन सुमारे 870 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ यांच्यावर हवाला आणि मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं आता या चौकशीनंतर छगन भुजबळांचं काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi