Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'जय'च्या तपासाठी सीआयडीला पाचारण

'जय'च्या तपासाठी सीआयडीला पाचारण
नागपूर , शनिवार, 27 ऑगस्ट 2016 (11:48 IST)
आशियातील सर्वात मोठा वाघ अशी ओळख बनलेला जय वाघाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने सीआयडीला पाचारण केलं आहे.

नागपूरच्या उमरेड अभयारण्याची ओळख बनलेला जय हा वाघ 18 एप्रिलपासून बेपत्ता आहे. त्याला शोधण्यासाठी 100 हून अधिक स्वयंसेवकांनी मोहीम राबवली आहे. तब्बल 250 किलो वजन असलेल्या या वाघाची एक झलक पाहण्यासाठी उमरेडला भेट द्यायचे. मात्र अचानक हा वाघ  गायब झाला.

दरम्यान, जय वाघाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने सीआयडीला पाचारण केलं आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गणेशोत्सवासाठी कोकणात विनाटोल गाड्या!