Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डीएसकेंच्या गाडीला अपघात चालक ठार : दोघांवर उपचार सुरु

डीएसकेंच्या गाडीला अपघात चालक ठार : दोघांवर उपचार सुरु
पुणे , गुरूवार, 26 मे 2016 (11:12 IST)
प्रसिद्ध उद्योजक डी एस कुलकर्णी यांच्या गाडीची कंटेनरला धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात त्यांच्या गाडीतील एकजण जागीच ठार झाला. तर स्वतः डी एस कुलकर्णी आणि त्यांचा एक सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लोकमान्य रुग्नालयात उपाचार सुरु आहेत.
 
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सखाराम कुलकर्णी तथा डी एस कुलकर्णी हे त्यांचे सहकारी किरण पांडुरंग काते ( वय 32) आणि निरंजन कापसिंग यांच्यासह मुंबईकडे जात होते. खंडाळा एक्झिटजवळ पुणे मुंबई लेन मधून जात असलेल्या एका कंटेनरला  त्यांची पाठामागुन धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता कि निरंजन यांचा जागीच मृत्यू झाला. तर डी एस के आणि काते हे गंभीर जखमी झाले. तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस आणि आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्नालयात हलवले. आयआरबीच्या रुग्णवाहिकेमधून त्यांना लोकमान्य रुग्नालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सूरु आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विद्यार्थ्याची आत्महत्या