Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉ. आंबेडकरांचे लंडमध्ये आंतराष्ट्रीय स्मारक

डॉ. आंबेडकरांचे लंडमध्ये आंतराष्ट्रीय स्मारक
मुंबई , शुक्रवार, 28 ऑगस्ट 2015 (09:15 IST)
लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थाचे रुपांतर आंतरराष्ट्रीय स्मारकात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या वास्तूची खरेदी लवकरच करण्यात येणार आहे. 
 
सन १९२१ ते १९२२ दरम्यान डॉ. आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण घेत असताना लंडनस्थित १०, किंग हेन्री रोड, एनडब्ल्यू-३ स्थित याच वास्तूत राहत होते. ही वास्तू एका इस्टेट एजंटच्या मार्फत विक्रीस काढण्यात आली होती. त्यानंतर ती खरेदी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या हालचाली सुरु होत्या. आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 
 
दरम्यान, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी या वास्तूच्या खरेदी व्यवहारांशी संबंधित कराराचे मालकासोबत अदान-प्रदान केले, असे ब्रिटनमधील फेडरेशन ऑफ आंबेडकराईट अ‍ॅण्ड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष संतोष दास यांनी सांगितले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi