Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तावडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : पृथ्वीराज चव्हाण

तावडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : पृथ्वीराज चव्हाण
मुंबई , शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2016 (14:32 IST)
पदाचा गैरवापर करुन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलीप करंबेळकर यांची महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळावर नेमणूक केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.  दिलीप करंबेळकरांना तातडीनं पदावरुन बाजूला करुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी तावडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, असंही चव्हाण म्हणाले.

करंबेळकर आणि विनोद तावडे हे दोघंही श्री मल्टिमीडिया कंपनीत संचालक आहेत. तसंच श्री मल्टिमीडिया संघाशी संबंधित असलेल्या तरुण भारतचं प्रकाश करतं. त्यामुळं तावडेंनी पदाचा गैरवापर करुन संघाची लोकं विश्वकोश निर्मिती केंद्रात घुसवण्याचा डाव आखल्याचा आरोप चव्हाणांनी केला आहे.
तावडेंनी मंत्र्यांच्या कोड ऑफ कंडक्टचा भंग केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही चव्हाण यांनी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi