Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तृप्ती देसाईंना मारहाण

तृप्ती देसाईंना मारहाण
कोल्हापूर , गुरूवार, 14 एप्रिल 2016 (12:06 IST)
अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेल्या भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाईंना पोलिसांच्या समोरच मारहाण झाली.

त्या साडीऐवजी पंजाबी ड्रेस परिधान करुन मंदिरात गेल्या होत्या. या गोष्टीवर स्थानिक नाराज होते. त्यामुळेच त्यांना मारहाण केल्याचं म्हटलं जात आहे. देसाई यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हायकोर्टाच्या आदेशानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईचा गाभारा महिलांसाठी खुला करण्यात आला. यानंतर तृप्ती देसाई दर्शनासाठी आल्याचं समजल्यानंतर स्थानिकांनी विरोध केला. मोठ्या संख्येने इथे नागरिक जमा झाले होते.

देसाईंनी संध्याकाळी 7.30 वाजता अंबाबाईची पूजा केली. गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर तृप्ती देसाई आणि  स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली. प्रशासनाने हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांच्या साथीने मला मारण्याचा कट रचल्याचा आरोप तृप्ती देसाईंनी केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi