Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दाभोळकरप्रकरणी सरकारवर ताशेरे

दाभोळकरप्रकरणी सरकारवर ताशेरे
, गुरूवार, 3 सप्टेंबर 2015 (10:16 IST)
मुंबई- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या तपासासाठी पुण्याबाहेरचे अधिकारी नेमणार्‍या राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयाने खरडपट्टी काढली. या प्रकरणी येत्या सात दिवसांत न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले आहे. त्याचवेळी तपासाबाबत स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने सीबीआयला दिले.

दाभोळकर यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण झाली तरीही त्यांचे मारेकरी हाती लागू शकलेले नाहीत. या प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi