Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, महाराष्ट्र राजला पहिल्या क्रमांकावर नेऊ

देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, महाराष्ट्र राजला पहिल्या क्रमांकावर नेऊ
नवी दिल्ली , शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2014 (12:16 IST)
महाराष्ट्राचे निोजित मुख्मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी राज्याचे भाजपचे भावी मंत्रिमंडळ बनविण्याबाबत चर्चा केल्याचे भाजपच येथील सूत्राकडून सांगण्यात आले. आपण व गडकरी हे दोघेही नागपूरचे असल्यामुळे व आमच्यामध्ये घनिष्ठ मैत्री आहे आणि भाजपच्या विचारसरणीनुसार काम करण्यामध्ये नेहमीच एकमत असते, असे फडणवीस यांनी सांगितले.
 
फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन शुक्रवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडिमवर होणार्‍या   राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. मोदी यांचा आदर्श समोर ठेवून आपले सरकार पारदर्शकपणे कारभार करेल आणि राज्याचा लौकिक वाढवेल, आपण छोटेखानी मंत्रिमंडळ बनवू आणि स्वच्छ प्रतिमेच्या भाजप आमदारांचा त्यामध्ये समावेश करू अशी ग्वाही त्यांनी मोदी व शहा यांना दिली आहे. राष्ट्रीय स्वंसेवक संघाच्या विचारप्रणालीमधून आपली राजकीय जडणघडण झालेली असल्यामुळे आपले सरकार नेहमी जनहिताचा कारभार करेल आणि जनसामानंचे प्रश्न सोडविणवर विशेष भर देईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राला देशामधील पहिल क्रमांकाचे राज्य बनविण्याकडे आपले सरकार लक्ष देईल आणि पाच वर्षाच कार्यकाळात राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेईल, असा मनोद फडणवीस यांनी बोलून दाखविला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi