Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवेंद्र फडणवीस यांना व्हायचंय विदर्भाचा मुख्यमंत्री?

देवेंद्र फडणवीस यांना व्हायचंय विदर्भाचा मुख्यमंत्री?
पुणे , बुधवार, 23 जुलै 2014 (11:48 IST)
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रंगीत तालीम सुरु केली असताना प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक प्रतिक्रीया देऊन खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्राचा नव्हे, तर विदर्भाचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी धक्कादायक भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

भाजपमध्ये नेतृत्त्वाबाबत अनेक नेत्यांनी दावेदारी केली असताना फडणवीस यांनी विदर्भ समर्थक भूमिका मांडून या चर्चेला कलाटणी दिली आहे. मी कायम विदर्भ समर्थक राहणार आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार असल्याचे लोक म्हणत असले तरी मला विदर्भाचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी प्रतिक्रीया देऊन फडणवीस यांनी एका वेगळ्या वादाला तोंड फोडले आहे. 

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपमध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपच्या गोटातून केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांच्या गटात प्रचंड अस्वस्थता पसरली होती. तसेच नितीन गडकरी यांच्यासह केंद्रातील नेत्यांनी या चर्चेवर महाराष्ट्रात सामूहिक नेतृत्वाचे सूतोवाच लावला होता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi