Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकमध्ये मतदानावरून महिलेला जिवंत जाळले

नाशिकमध्ये मतदानावरून महिलेला जिवंत जाळले
नाशिक , शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2014 (16:56 IST)
येवला तालुक्यातील बाभूळगाव खुर्दमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावरून एक महिलेला जिवंत जाळण्याचा घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. महिला 60 टक्के भाजली गेली असून तिच्यावर उपचार करण्‍यात येत आहे. 
 
झेलुबाई जगन्नाथ वाबळे (65) असे पीडित महिलेचे नाव असून ती घरासमोरील ओट्यावर गुरुवारी रात्री आठच्या सुमारास बसली होती. गावातील अशोक सोपान बोरनारे, पांडुरंग सोपान बोरनारे, नंदकिशोर विश्वनाथ भुरक हे झेलुबाई यांच्या घरी गेले. आम्ही तुला तीन नंबरचे बटन दाबून मतदान करण्यास सांगितले होते, तू दोन नंबरचे बटन दाबले का असा जाब विचारत तिच्या अंगावर रॉकेल टाकून जाळले. यात झेलूबाई या 60 टक्के भाजल्या असून, त्यांना उपचारासाठी ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi