Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंतप्रधानांच्या दौर्‍यातून शिवसेना ‘आऊट’?

पंतप्रधानांच्या दौर्‍यातून शिवसेना ‘आऊट’?
मुंबई , सोमवार, 12 ऑक्टोबर 2015 (11:39 IST)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलवरील स्मारकाच्या भूमिपूजनासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वच कार्यक्रमांवर शिवसेनेने बहिष्कार टाकला. मात्र,  पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेल्या निमंत्रितांच्या यादीत उद्धव ठाकरे यांचे नावच नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
भूमिपूजनाच्या कार्यक्रमापासून प्रमुख राजकीय पक्षांना दूर ठेवतानाच दलितांशी बांधिलकी असलेल्या सर्व पक्षांना भाजपने आमंत्रित केले. डॉ.आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर, आनंदराजसह रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे, रा. सू. गवई यांचे चिरंजीव डॉ. राजेंद्र यांना खास आमंत्रण होते. भूमिपूजनानंतर वांद्रे-कुर्ला संकुलातील सभेलाही यातील काही नेत्यांनी हजेरी लावली.
 
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ‘मातोश्री’ची वेळ मागितली होती; मात्र येऊ नका, असे त्यांना कळविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi